टॉप बातम्या

शिरपूर पोलिसांनी उधळून लावला कोंबड बाजाराचा डाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यात कोंबड बाजाराला मोठे उधाण आले आहे. एक नाही,दोनदा नव्हे तर, तिसऱ्यांदाही पोलिसांनी शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शिंदोला शेत शिवारातील या कोंबड बाजाराचा डाव उधळून लावल्याची घटना आज दिनांक १ डिसेंबर ला घडली. यात लाखोंच्या वर मुद्देमाल जप्त करित सहा आरोपी वर कारवाई चा बडगा उगारला आहे.

तालुक्यातील शिंदोला शेतशिवारात काही लोक एकत्र जमाव करून कोंबड्याच्या झुंज लावून राजरोसपणे खेळत असल्याची गोपनीत माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच मोठया शिताफीने सापळा रचून पोलीस टीमच्या मदतीने शिंदोला ते कळमना जाणाऱ्या रोडच्या नजीक कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली असता सदर धाडीमध्ये मध्ये तीन जिवंत कोंबडे, सहा मोटरसायकल व नगदी असा एकूण ३,४४,०३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी अंकुश कवडू गोहोकर, विलास महादेव मरसकोल्हे, सुरेश बाबाराव वाबेटकर, गुजरात भास्कर थेरे, विनोद हरिदास येडे, अजित रमेश दुबे, असे एकूण सहा जण मिळून आले. त्यांच्यावर पोलिसात ४७१/२३ कलम १२ (ब) म.जू.का.प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 
     
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संजय राठोड, पीएसआय रामेश्वर कांडूरे, सुनील दुबे, प्रशांत झोड, निलेश भुसे, गुणवंत पाटील, घोडाम यांनी केली.
Previous Post Next Post