भाडे करार करायचाय? काळजी करू नका, घरबसल्या ऑनलाईन प्रकारे 'असा' करा भाडे करार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

हल्ली भाडेकरू ठेवताना घर मालक कराराशिवाय घर भाड्याने देत नाहीत. तसेच पोलीस प्रशासनाने भाडेकरूंसाठी ठेवलेल्या काही अटींमुळे अनेकदा भाडेकरू ही मिळत नसल्याच्या समस्या जाणवतात. मात्र या सगळ्यावर मुद्रांक शुल्क विभागाने मार्ग काढला आहे. त्यामुळे घर मालकांनाही मोठा दिलासा मिळला आहे. आता घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाइन भाडेकरार झाल्यानंतर घरमालकांना प्रत्यक्षात पोलिस ठाण्यांत जात माहिती देण्याची गरज नसणार आहे. तसेच, नोटरी अथवा ऑफलाईन कटकटी दुर झाल्या आहेत. 

राज्याच्या ऑनलाईन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्सद्वारे पोलिसांना ऑनलाइन मिळत आहे. त्यामुळे पूर्वीसारखे शंभर किंवा पाचशे रुपयांच्या मुद्रांकावरील भाडेकरार आता कालबाह्य होताना दिसतायेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदवण्यात येणारे ऑनलाइन भाडेकरार कायदेशीर करण्यात आले आहेत. 

घर भाड्याने घेते/देते वेळी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं घरमालक आणि भाडेकरूसाठी आवश्यक असतं. रेंट अ‍ॅग्रीमेंट अर्थात भाडे करार हा त्यापैकीच एक भाग होय. रेंट अ‍ॅग्रीमेंट करण्यासाठी खूप धावपळ आणि मेहनत करावी लागते. यामुळे घरमालक आणि भाडेकरू अशा दोघांचाही वेळ आणि पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता रेंट अ‍ॅग्रीमेंट अगदी घरबसल्या करता येणार आहे.

या प्रकारे करा ऑनलाईन भाडे करार :
● सर्व प्रथम यासाठी भाडेकरू/जमीनमालकांनी ई-फायलिंग वेबसाइट https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/ भेट देऊन प्रोफाइल तयार करावे लागेल. 
● प्रोफाईल तयार केल्यानंतर मालकाने मालमत्तेची संपूर्ण माहिती प्रविष्ट करावी. 
● यामध्ये वापरकर्त्याचे गाव, तहसील, मालमत्ता व्यावसायिक आहे की निवासी अशी सर्व माहिती द्यावी लागेल.


Previous Post Next Post