वणी वरून गृहरक्षक दलाचे जवान तेलंगणा येथे रवाना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : होऊ घातलेल्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुक असुन, येत्या 30 नोव्हेंबर रोजी येथील मतदान पार पडणार आहे.

आज सोमवार दि. 27 नोव्हेंबर ला दुपारी तेलंगणा येथील बंदोबस्त साठी तेलंगणा येथूनच आलेल्या महामंडळाच्या 3 बसेस ने महाराष्ट्राचे गृहरक्षक दलाचे जवान रवाना झाले असल्याची अशी माहिती आहे.

होऊ घातलेल्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे जवान वणी मारेगाव, मुकुटबन, शिरपूर, पाटण येथून तेलंगणा कडे रवाना झाले आहेत. 
Previous Post Next Post