सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना 9 सप्टेंबरला आंध्र प्रदेश सीआयडीनं अटक केली. यांच्या अटकेचा निषेधार्थ मारेगाव येथे त्यांच्या शेकडो समर्थकांनी तथा शेतकऱ्यांनी केंद्र सरकार व आंध्र प्रदेश सरकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करत लोकशाही मार्गाने आंदोलनं करून तहसीलदार निलावाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मारेगाव तालुक्यात वास्तव करित असणाऱ्यांना नायडू समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती.
चंद्रबाबू नायडू यांना कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेनंतर देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना त्यांचे समर्थक ठिकठिकाणी आंदोलनं करून याचा निषेध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज 18 सप्टेंबर रोजी मारेगावतही एका प्रामाणिक आणि विकास पुरुष अशी ओळख असलेल्या चंद्रबाबूंच्या समर्थनार्थ शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील आंध्र प्रदेश व केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
यावेळी समर्थकांनी 'सह्याद्री चौफेर' बोलताना म्हणाले की, नायडू यांना सन्मानपूर्वक त्यांच्या वरील गुन्हा मागे घेऊन केंद्र सरकारने देशातील महागाई, बेरोजगारी, जाती समाजासमाजत निर्माण होत असलेले तेढ बंद करुन जनतेच्या कल्याणकडे लक्ष द्यावे, जनतेला मूर्ख बनवून एका प्रामाणिक आणि जनहितार्थ कामे करणाऱ्या माणसाला त्रास देवू नये, आणि असे होत असेल तर जनता येत्या लोकसभा निवडणूकीत या सरकार निश्चित आपला हात मतदानातून दाखवतील यात आता काहीच शंका नाही.
यावेळी मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांना निवेदन देताना माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांचे समर्थनार्थ हजारो आंध्र प्रदेशचे मारेगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेचा निषेधार्थ मारेगाव येथे आंध्र प्रदेश सरकारचा निषेध व आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 18, 2023
Rating:
