'तो' शासन निर्णय रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : राज्यातील शासकीय कार्यालयामध्ये खाजगी यंत्रणेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरती बाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, यासाठी  तालुक्यातील अधिकारी होऊ पाहणारे शेकडो विद्यार्थी आज तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी निवेदनातून तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा,अशी जोरदार घोषणाबाजी करत मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासुन शासकीय नौकरभरती घेण्यात आलेली नाही. या नौकरभरतीची बरेच सुशिक्षीत विद्यार्थी-विद्यार्थीनी चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत होते. बऱ्याच दिवसांपासून या विद्यार्थी- विद्यार्थीनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. हा शासन निर्णय त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील संपूर्ण तरुणांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. या शासन निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे जीवन अंधकारमय होईल व त्यांना की बड्या कंपन्याची गुलामगिरी करावी लागेल. संबंधीत शासन निर्णयामुळे आरक्षणाची मागणी सुद्धा धोक्यात आलेली आहे. कंत्राटी पद्धतीने काम करत असल्यामुळे भविष्यात त्यांची नोकरी कायम राहील किंवा नाही ही भिती सुद्धा तरुणांच्या मनामध्ये सतत राहील. त्यामुळे तो शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी लढा संघटनेची मागणी आहे.
शासनाने बाह्य यंत्रणेद्वारे शासकीय कामे करुन घेण्याचे जे धोरण आखलेले आहे, ते अत्यंत चुकीचे असून महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांच्या हिताचे नाही.त्यामुळे दि. ०६/०९/२०२३ चा शासन निर्णय रद्द करावे, अन्यथा येत्या ७ दिवसात सदर शासन निर्णय रद्द न झाल्यास महाराष्ट्रातील तमाम तरुणाई रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना लढा चे प्रवीण खानझोडे, अ‍ॅड. रुपेश ठाकरे, विकेश पानघाटे, वैभव ठाकरे सर, ललित लांजेवार, राहुल झट्टे, महादेव तूरणकर, सुभाष लसंते, अजय कवरसे, सिमा कुमरे, पायल टिपले, सुरभी महाकुलकार, विलास काशीकर, तानिया पठान,  प्रियंका गेडाम, श्रद्धा राजुरकर, अश्विनी वाघमारे, पायल टेंभुरकर, वैष्णवी चेंदे, करिश्मा आडे, स्वरा उईके, निलिमा मोन, प्रिया राजुरकर, प्रतिक्षा पांगुळ, नेहा ठाकरे, काजल बोबडे, निकिता बावणे, पलाश मोतेकर,  ज्ञानेश्वर कोरडे, महादेव तेजे, अक्षय नालमवार, गणेश किनाके,  मयूर बेलेकर, प्रफुल मोहितकर,  वैभव चिंचोलकर, आकाश हिवरे, हेमंत क्षीरसागर, असे शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.



'तो' शासन निर्णय रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी 'तो' शासन निर्णय रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on September 18, 2023 Rating: 5
Powered by Blogger.