सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील वृद्ध शेतकरी महिला आपल्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयाच्या समोर दि.13 सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसली आहे. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. परंतु, स्थानिक प्रशासन त्या 76 वर्षीय वृद्ध महिलेकडे फिरकले नाही. मात्र, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते या उपोषण कर्त्या वृद्ध महिलेच्या उपोषणस्थळी भेट घेत तीची विचारपूस करित आहे.
नुकताच शेतकऱ्याचा सण 'पोळा' हा उत्सहात साजरा झाला. तालुक्यातील शेतकरी पोळा साजरा करण्यात व्यस्त, मात्र ह्याच तालुक्यातील वृद्ध महिला अनुसया जहांगीर फुलझेले (रा डोर्ली) ही वृद्ध महिला पोळा सारखा सणवार बाजूला सारून आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसून आहे. तीची मागणी एकच आहे की, गट नंबर 82 मधील फेरफार क्र.441 हा रद्द करुन फेरफार क्रमांक 401 हा कायम करावा एवढंच. यासाठी तिचा संघर्ष सुरु आहे. उपोषणाचा सहावा दिवस लोटला असून आज सातवा लागला आहे.
सविस्तर असे की, वृद्ध महिलेच्या वडीलाच्या मृत्यू नंतर आईने दुसरा विवाह केला होता. दुसऱ्या विवाहानंतर दोन मुले जन्मली या मुलांना आईने पतीच्या शेतीवर वारस हक्काचा दावा करत फेरफार केला. या शेतजमिनीवर वृद्ध महिला अनुसया फुलझेले पहिल्यां आई वडिलांची एकमेव वारस असताना दुसऱ्या पती पासून झालेल्या वारसाचा फेरफार घेणे बेकादेशीर आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने झालेली नोंद रद्द करून माझ्या नावाने नोंद घेण्यात यावी, यासाठी तिने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बेकादेशीर नोंद केली असून या मधून त्यांनी मोठी अवैध कमाई केली असा आरोप करण्यात आला आहे.
चुकीचा झालेला फेरफार रद्द करण्याठी या वृद्ध महिलेने अप्पर आयुक्त अमरावती यांचे पर्यंत लढा लढीत चुकीचा फेरफार रद्द करण्याचा आदेश प्राप्त केला. मात्र, स्थानिक प्रशासनाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासना च्या विरोधात तिने उपोषण सुरु केले आहे. या वृद्ध महिलेच्या आज उपोषणाचा सातवा दिवस आहे.
आजचा सातवा दिवस: वृद्ध महिला न्यायासाठी बसली आमरण उपोषणाला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2023
Rating:
