Top News

मारोती कान्होबा शेंद्रे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा -आदिवासी गोंड गोवारी आरक्षण समितीची मागणी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली शिवारात दि.11 सप्टेंबर रोजी मारोती कान्होबा शेंद्रे या 65 वर्षीय वृद्धाचा संशयांस्पद मृतदेह आढळून आला होता. या घटनेला आता जवळपास सात दिवस लोटत आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे मात्र, तपास यंत्रणा एकदम धिम्या गतीने असल्यामुळे आदिवासी गोंड गोवारी आरक्षण समितीच्या वतीने तपास जलद गतीने व सखोल चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ठाणेदार खंडेराव यांना देण्यात आले.

मारेगाव तालुक्यातील मांगली शिवारात मारोती कान्होबा शेंद्रे रा. कुंभा रोजंदारीने काम करित असताना दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान संशयांस्पद मृतदेह आढळून आला. दरम्यान, वृद्ध इसमाच्या मृतदेहावरुन नाना तर्हेच्या चर्चा होत होत्या, मात्र त्याचा खून झाल्याचे कुटुंबातील सदस्यांना संशय आहे. संबंधितानी संघटनेकडे आपली मत व्यक्त केली. त्यामुळे सदर घटनेचा त्या पद्धतीने व जलदगतीने तपास करुन या घटनेतील सत्य उजागर करावे अशी मागणी संघटनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे. मृतक हे रोजंदारीने बाळू पांढरे यांच्या शेतात काम करित होते, मात्र अचानक त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने या प्रकरणी तर्क वितर्क लावले जात होते. सात दिवस झाले,अजूनही सदर घटनेचे रहस्य कायम आहे. मात्र मारोती कान्होबा शेंद्रेचा खून झाल्याचे शंका नातवंडानी वर्तविली आहे. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी अध्यक्ष माधव कोहळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे, जर का या प्रकरणी दिरंगाई व दुर्लक्ष झाले तर संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधव कोहळे यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले आहे. निवेदन देताना माधव कोहळे, राजकुमार राऊत, मोरेश्वर राऊत, विठ्ठल शेंद्रे, सतीश राऊत, विकास राऊत आदीची उपस्थिती होती. 



Previous Post Next Post