सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर
मार्डी : गणेशोत्सवाचे मारेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागालाही वेग आला आहे. गणेशोत्सव मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी असुन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या हालचाली गतिमान झाल्या असून, मूर्ती निश्चित करण्यापासून पदाधिकारी नियुक्तीची लगबग दिसून येत आहे. ग्रामीण भागात गणेशोत्सव हा सर्वाधिक धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो.
अकरा दिवस सर्वत्र धार्मिक वातावरण पसरलेले पाहायला मिळतं. सकाळ,संध्याकाळ आरती,पूजा कार्यक्रम होतात, याची तयारी जय्यत करताना दिसून येत आहे. अनेकजण यामध्ये गुंतले असून यंदा परवानगी ही पुढील पाच वर्षां करिता एकदाच मिळणार आहे. विशेष म्हणजे भाविक आपल्या आवडीनुसार मूर्ती खरेदीला प्राधान्य देतात. गणेश चतुर्थीला होणारी गर्दी लक्षात घेऊन आताच मूर्ती ठरविण्यासाठी कुटुंबे, शहरात दाखल होत आहेत. अर्ध्या,एक फुटापासून तर ४/५ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे.
मारेगाव: गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाचे वेध...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 17, 2023
Rating:
