सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आज गुरुवार दि.24/08/2023 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, इसम नामे गणेश सुरेश फाले रा. कानडा गावात अवैधरित्या देशी दारूची विक्री करतो. गुप्त माहितीवरून ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनाखाली रजनीकांत पाटील व जिड्डेवार यांनी कानडा येथे जाऊन सदर घराची झडती घेतली असता, त्यामध्ये देशी दारू एकूण 21 पव्वे रु. 1470/- च्या मुद्देमाल मिळून आला.
दरम्यान,देशी दारू आरोपीचा मुद्देमाल जप्त केला असून कलम 65 (अ), मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी गणेश सुरेश फाले (अंदाजे वय 35 वर्षे) रा. कानडा याचे वर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलिस करित आहे.
कारवाई बाबत आमच्या प्रतिनिधीने पोलिसांशी संवाद साधला असता नापोकॉ रजनीकांत पाटील म्हणाले की, अशा प्रकारावर आम्ही सतत "वाच" ठेऊन आहे. फक्त यासाठी गावाकऱ्यांनी माहिती देऊन सहकार्य करावे. असे आवाहन देखील केले आहे.