तालुका अध्यक्ष पदी रुपेश ढोके तर, शहराध्यक्ष पदी चांद बहादे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष‎ राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वणी येथील कार्यालयात पदनियुक्ती सोहळा‎ पार पडला. यावेळी आगामी‎ काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता पक्ष‎ बांधणी व नवीन कार्यकर्त्यांना‎ संधी देण्यात येत आहे.‎ त्याअनुषंगाने मारेगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी‎ घोषित करण्यात आल्याची माहिती‎ मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी आज प्रसिद्धी पत्रकातून दिली.

मारेगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी‎ तयार करण्यात आली आहे.‎ मारेगाव शहराध्यक्षपदी चांद बहादे, शहर संघटकपदी नबी शेख तर रुपेश ढोके यांची तालुका अध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच‎ मनसे (कुंभा विभाग अध्यक्ष व मार्डी विभाग अध्यक्ष)‎ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात‎ आली आहे. यात कुंभा विभाग अध्यक्ष पदी‎ आदित्य बुच्चे तर मार्डी विभाग अध्यक्ष रोहित हस्ते यांची सर्वानुमते निवड‎ झाली आहे. दरम्यान, नवनियुक्त कार्यकारिणीचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनसे हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पक्षाला आता भरारी‎ देण्यासाठी तरुणाईला‎ जिंकण्यासोबत जनतेच्या न्याय हक्का साठी लढण्याची गरज आहे.‎ यावेळी नियुक्ती सभेला पक्ष नेते राजू उंबरकर,‎ जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, धनंजय त्रंबके, शिवराज पेचे, फाल्गुण गौरकार, आदीं उपस्थित होते.‎