सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांची अमरावती येथे दि.27 जुलै रोजी सभा बोलवली होती. भिडे हे आपल्या कार्यक्रमातून महापुरुषांचा अवमान सतत करत असतात यामुळे जातीय दंगल पेटविण्याचा प्रयत्न भिडे यांच्या विधानावरून दिसत असल्याने अखिल भारतीय माळी महासंघाकडून त्यांचा निषेध केला आहे.
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील आपल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर हल्ला केला, यामुळे माळी महासंघ आक्रमक झाली असून अखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारेगाव येथे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन त्यांचा जाहीर निषेध केला व भिडे यांचे वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तसेच त्यांच्या सभेवर बंदी घालण्यात यावी अशी सुद्धा मागणी माळी महासंघाच्या वतीने केली आहे.
प्रदेशाध्यक्ष राजेंद्र महाडुळे, व जिल्हाध्यक्ष राम भेंडाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मांदाडे, अमोल गुरनुले, राजुभाऊ शेंडे, राहुल भंडारे, मनोज शेंडे, राम भेंडारे, दिलीप सोनुले, राजुभाऊ रस्से, कार्तिक शेंडे, महेश बाटगुरे, विवेक बुजाडे, सचिन मोहितकर, अनंत मांडवकर, किशोरे गुरनुले, मनोहर मोहुर्ले, कैलास ठाकरे, दिगांबर आत्राम, रवि निखाडे, सुभाष आत्राम, नरेंद्र गुरुनुले, आकाशकांत भासले, गणेश सोनुले, नामदेव रस्से आदींची उपस्थिती होती.