वणीत रस्त्यासाठी अनोखे आंदोलन, भर उन्हात "तो" झोपला

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कोर्ट, पोलीस स्टेशन या सर्वत्र रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी आर टी आय तथा सामाजिक कार्यकर्ते दादाजी पोटे यांनी अनोख्या आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी चक्क भर उन्हामध्ये रस्त्यावर झोपून आंदोलन केले.

रस्त्यात झोपून आंदोलन करून संबंधित विभागाला शर्मेने मान खाली घालण्याची अश्या प्रकारच्या आंदोलनाची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र जोरदार या आंदोलना ची चर्चा सुरू आहे. वणी येथील पोलीस स्टेशन, पंचायत समिती, न्यायालय, तहसील कार्यालयाचे रस्ता हे शेवटच्या घटका मोजताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात तालुक्यातील शासकीय कामासाठी येणाऱ्या निराधार वयोवृद्धाना, विविध लाभार्थ्यांना येथील चाळणी झालेल्या रस्त्याने ठेचा खाव्या लागतात, परिणामी अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

गेली अनेक वर्षे येथील परिसरातील रस्ते दुर्लक्षितच राहिला आहे. याच रस्त्याकरिता निवेदन, मागणी आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पोटे हे भर रस्त्यात झोपून आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करित आहे. या रस्त्याने जाताना  नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावर सध्या सर्वत्र खड़ी व दगड बाहेर पडले आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याने दादाजी पोटे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आतापर्यंत आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, मोर्चा, धरणे आंदोलन, साखळी उपोषण, रस्ता रोको असे अनेक आंदोलन नागरिकांनी पाहिलेत पण सामाजिक कार्यकर्ते दादाजी पोटे यांचे भर लोटांगण घालत बैठा आंदोलन चर्चेचा विषय बनला असून, तूर्तास कोणीही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकले नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.