सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
याबाबत मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान, पिंपळशेंडे परिवारातील सदस्य सर्वजन जेवन करून शेजारी राहणारे पंढरी लेनगुळे यांचे स्लॅप वर जावून झोपी गेले. मध्यरात्री 16 जून च्या पहाटे 2. वाजताचे सुमारास आजी लघुशंकेला उठली असता नात ही आजीच्या बाजुने झोपुन होती, परंतु नात दिसली नसल्याने आजीने मुलाला व सुनेला झोपेतून उठवुन नात ही दिसत नाही.कुठेतरी निघुन गेली असे सांगितले. दरम्यान, तीचा गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. ती अल्पवयीन असल्याने तिचा अज्ञानपणाचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले असावे अशी तिच्या आजीने नात हीचा शोध घेण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली. अज्ञाताने अज्ञात कारणासाठी अल्पवयीन मुलीला पळवून नेले. अशा नातीच्या घरच्यांना संशय असून तीचे घरून आधारकार्ड, बँकेचे पासबुक, तिचे कपडे, टीसी सोबत नेले. मात्र, मोबाईलमुळे एक क्षण भर न राहणारी आजकालची पिढी, तिचा मोबाईल घरीच आहे.ती मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयातून जेमतेम बारावी पास झाली. तिचा मोबाईल सोबत नसल्याने बेपत्ता मुलीची काळजी परिवाराकडून केली जात आहे. आमच्या मुलीचा शोध जलदगतीने घ्यावा अशी आर्तहाक बेपत्ता मुलीच्या घरच्यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले.
पुढे तक्रारीत तिचे वर्णन रंग गोरा, उंची 5 फुट, बांधा सळपातळ अंगात फिक्कट गुलाबी रंगाचे टिशर्ट व काळ्या रंगाचे प्लाजो असे वर्णन सुद्धा तक्रारी मध्ये नमूद आहे. मुलगी घरून निघुन गेली असली तरी ती अल्पवयीन असल्याने तिला कोणतरी अज्ञात इसमाने पळवून नेले. अशी तक्रार नातीच्या आजीने पोलिसात दिली.
सदरील घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे.