Page

जैताई मंदिरात बहारदार नृत्याचा कार्यक्रम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त जैताई मंदिर येथे दरवर्षी विविध कार्यक्रमाद्वारे उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक 25 मार्च ला सायंकाळी सात वाजता जैताई मंदिर च्या प्रांगणात नागपूर येथील प्रसिद्ध नृत्यांगना सूचना बंगाले व त्यांची चमू गीत रामायणावर आधारित निवडक गीतांवर शास्त्रीय नृत्यद्वारे सादरीकरण करणार आहे. तरी वणीतील रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.