टॉप बातम्या

महिला शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ व धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : शेतकरी उन्हाळ्याच्या मध्य काळात विविध पिकांची लागवड करून उत्पन्न घेतली जातात म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर घेतली जातात. या उत्पादनाला संरक्षण म्हणून सोलर झटका मशीन चा सर्रास वापर शेतकरी करतात. किंबहुना काटेरी कुंपणही केले जातात. आधीच शेतकरी अतिवृष्टीने आणि नुकतीच अवकाळी पावसाची झळ या अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत असतांना आता मानवी संकटासह मोकाट पशुधन संकटाचा सामना करावा लागत आहे. कितीही शेतीसाठी संरक्षण केले तरी शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचे तक्रारी निदर्शनास आपल्या येते. मात्र बुद्धीपुरस्पर नुकसान केलेले हे क्वचितच प्रकरण ऐकावंयास मिळतं. अशीच नुकसान केल्याची तक्रार मारेगाव पोलिसात दाखल झाली. पिसगांव येथील एका महिला शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान करून सदर महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दोन पुरुष शेतकऱ्याकडून देण्यात आली. या प्रकरणी रीतसर तक्रार त्या इसमाच्या विरोधात देण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्व्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, पिसगांव येथे दोन एकर वंदना मारोती गौरकर (47) रा पिसगांव यांचे शेत आहे. त्या दोन एकरात मिरची चे पिक पेरले असून त्या उत्पादनाला संरक्षण मिळावे म्हणून सोलर झटका मशीनचे तार कुंपण केलेले असताना देखील काही मुजोर शेतकऱ्यांनी जाणूनबुजून पिकाचे नुकसान करण्याचे हेतूने आपले पाळीव जनावर (गाय) उभ्या पिकात सोडल्याने पिकांचे नुकसान झाले, याबाबत त्या पशुधन मालकाला जॉब विचारला असता त्यांनी या महिला शेतकऱ्याला व तीच्या पतीला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, महिला शेतकऱ्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तीचे ऐकूण न घेता उलट त्यांना एकदम खालच्या पातळीवरील शिव्या दिल्या, त्यामुळे महिला शेतकऱ्याने मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. महिला शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीतून गैरअर्जदार रामदास सखाराम पाचभाई व विजय रामदास पाचभाई रा. पिसगांव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार असून, पोलिसात वरील शिवीगाळ करणाऱ्या पशुधन मालकावर कलम 427,294, 506 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.


खरंतर माझ्या या घटनेशी काहीही संबंध नाही. तरी देखील या गैर अर्जदारांनी माझं नाव जाणूनबुजून टाकून मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. किंबहुना आर्थिक लाभ मिळावा यासाठी हा केलेला हा त्यांचा शंभर टक्के प्रयत्न आहे. माझा राजकीय प्रवास पाहता मला कुठं तरी मला माझ्या कुटुंबातील लोकांना अडकून ठेवण्याचा विरोधकांचा डाव आहे. आणि मी डाव त्यांचा हाणून पडणार आहे. मी सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून न्यायालयात जाणार आहे.

- मारोती माधव गौरकार
तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मारेगाव 
Previous Post Next Post