टॉप बातम्या

सखी मंचच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम मारेगाव येथे..

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : काल दिनांक २० जानेवारी रोजी सखी मंच मारेगाव च्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सौ अंजना ताई पैकुजी आत्राम यांच्या निवास स्थानी घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रंजना सुंदरलाल आत्राम यांनी केले तर प्रास्ताविक सौ अंजना आत्राम यांनी केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रूपाली ताई आनंदराव मसराम तर प्रमुख वक्ते म्हणून सौ. सुचित्रा ताई मंगेश गवळी या होत्या. कल्पनाताई मेश्राम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यशोदा वाघाडे, दुर्गा आत्राम, मनिषा वाढणकर साक्षी पाडसे यानी स्वागत गीत सादर केले.

सदर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुस्तके महिला तसेच मुलींना सुध्दा देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ अश्विनी अजय शिंदे यांनी केले.
Previous Post Next Post