आठवडी बाजार,चौपाटी बार ते घुगूस मुख्य रस्त्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करा - युवासेना उप जिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांची मागणी

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आठवडी बाजार, चौपाटी बार ते घुगूस मुख्य रस्त्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करून सदर रस्ता पुन्हा बनवून देण्यात यावा अशी मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. 
शहरातील दीपक चौपाटी ते आठवडी बाजार हा सिमेंटचा रस्ता बनविण्यात आला. हाच रस्ता समोर वाढविण्यात आला व एका वर्षांपूर्वी नगर परिषद अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 6 मधील आठवडी बाजार ते चौपाटी बार ते घुगूस मुख्य रस्त्याला जोडणारा डांबरी रस्ता (डी पी रोड) बनविण्यात आले. परंतु हा रस्ताच एक पावसाळा सहन करू शकला नाही. एकाच पावसात सदर रस्ता धुवून निघाला. एका वर्षाच्या आतच या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने निदर्शनास येत आहे. संपूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आलेले साहित्य अतिशय निकृष्ट असल्याने रस्ताच दर्जेदार बनला नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून तर काही ठिकाणी रस्ता दबला आहे. त्यामुळे रस्ता दबल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या रस्त्याची आपल्या स्तरावरून विस्तृत पडताळणी करून सदर रस्ता पुन्हा बनविण्यात यावा, अशी मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी तहसीलदार निखिल धुळधर यांचे मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
यावेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, शिवराम चिडे, प्रफुल बोर्डे, स्वप्नील गट्टेवार, विक्रम कुलकर्णी, चेतन उलमाले, निखिल गट्टेवार आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post