सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. आवारी मॅडम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. कुरेकर सर होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मस्की मॅडम प्रा. सातपुते मॅडम प्रा. बेतवार मॅडम, प्रा. चिंचोलकर सर प्रा. ए.चोपणे प्रा. दानखेडे सर होते.
कार्यकामाचे प्रास्ताविक चिंचोलकर सर यांनी केले तर अध्यक्षीय भाषनातून प्रा. आवारी मॅडम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच प्रा. कुरेकार सर यांनी सुद्धा आपले विचार मांडले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व निलेश बेंडे (लिपिक), विकास ढोके व विध्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.