संविधाना प्रती सजग राहून संविधानाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे - प्राचार्य हेमंत चौधरी सर


सह्याद्री चौफेर | रवी घुमे 
        
मारेगाव : आज संविधान दिनानिमित्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे संविधान दिन व संविधान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कुरेकार सर, प्रवीण पोटे सर, चिंचोलकर सर, आवारी मॅडम, सातपुते मॅडम. धानोरकर मॅडम तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक मोहन पायघन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल माईंदे हिने केले तर आभार प्रदर्शन आचल गेडाम हिने केले
मान्यवरांनी संविधान बद्दल सखोल अशी माहिती देऊन आपले अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याची जाणीव करून दिली.
वकृक्त स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक दिव्या चटपल्लिवार. द्वितीय क्रमांक जया कालेकर तर तृतीय क्रमांक प्रगती थेरे हिने पटकावला..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चिंचोलकर सर आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले..
Previous Post Next Post