टॉप बातम्या

धोत्रा येथे अपघातात एकाच मृत्यू दोन गंभीर

रुस्तम शेख : सह्याद्री चौफेर 

कळंब : तालुक्यातील धोत्रा येथे राळेगांव रोड वर अपघात झाला असुन या मध्ये एक व्यक्तीचा मृत्यु झाला असुन दोन व्यक्ती गभीर जखमी झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज रोजी सांय ६-०० वा दरमान यवतमाळ येथुन राळेगांव कडे जाणारी महेंद्र XUV -3०० ( गाड़ी क्र MH-29-BP9110 )या चार चाकी वाहणाने धडक दिल्याने रोही ठार झाले तर राळेगांव वरून कळंब कडे जाणाऱ्या TVS लुना (गाडी क्र MH-29AX95o9) चालक नामे प्रदीप नारायण पेंदरे वय ४८ वर्ष रा पारवेकर नगर कळंब याला सुद्धा धडक लागल्याने जागीच ठार झाला . तर चार चाकी गाडीचे चालक व सोबत असलेले एक व्यक्ति गंभीर जखमी झाले असुन उपचारा करीता यवतमाळ येथे शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले.

पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजीत राठोड यांच्या मार्गदर्शन खाली सुरू आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();