टॉप बातम्या

निंबाच्या झाडावर विज कोसळली

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : शहरात आज शनिवारी झालेल्या जवळपास तीस मिनिटाच्या मुसळधार पावसात अचानक कडकडाट झाला. एक मिनिटासाठी हृदय थक्क झाले आणि समजले की, मारेगाव पंचायत समिती येथील एका निंबाच्या झाडावर विज पडली.
मागील तीन दिवसापासून तालुक्यात धुवाधार पावसाने थैमान घातले आहे. संततधार पावसाने जन जीवन प्रभावित झाले असतांना आज दुपारी पावसाने मारेगावात दमदार हजेरी लावली आणि अचानक आकाशात विजेचा कडकडाट झाला, त्यात काही सेकंदातच पंचायत समिती च्या आवारातील मायेची सावली देणाऱ्या निंबाच्या झाडावर विज कोसळली असून मोठी हानी टळली आहे.
आज दुसरा शनिवारी प्रशासकीय कामकाजाला सुट्टी असल्याने येथील पंचायत समिती कार्यलयात कोणीच नसल्याने मोठी हानी टळली. निंबाच्या झाडावर वीज कोसळून या झाडाच्या भल्या मोठ्या फांद्या दुभंगलेल्या दिसून आले.
परिणामी जीवितहानी झाली नसली तरी मात्र, विज झाडावर पडल्याने वृक्षप्रेमीत चर्चेचा विषय ठरला. 

Previous Post Next Post