सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सतंतधार पावसाने चांगलीच मजल मारली आहे. या पावसामुळे जन जीवन प्रभावित झाली असून शेतकऱ्याची पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अशातच आता नागपूर हवामान विभागाने वणी तालुक्यातील नागरिकांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवसात अतिवृष्टीचा होण्याचा इशारा वणी तालुक्यातील नागरिकांना नागपूर हवामान खात्याने दिला आहे.
त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी नदी व नाल्या जवळील नागरिकांना महत्वाचे कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये, कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असल्यास नागरिकांनी त्या पुलावरून वाहतूक करू नये, रांगना ते वणी या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहते तसेच तो पूल खचला असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक सदर रस्त्याने होणार नाही याची तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच नैसर्गिक आपत्ती संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१) नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष यवतमाळ.
07232 240720
२) नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष वणी.
07239 225062
३) मा. तहसीलदार वणी मो.नं
9356809418
४) पोलीस निरीक्षक वणी.
8888825890
५) पोलीस निरीक्षक शिरपूर.
9527818484
६)पोलीस निरीक्षक मुकुटबन.
9823308230
असे नागपूर हवामान खात्याने कळविले आहे.