कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर 'चित्रायण' व डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'जलनायक' या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या १४ जुलै रोजी नांदेड येथे निमंत्रितांसाठी विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.
'जलनायक' हा माहितीपट लवकरच 'ओटीटी'वर आणण्याचा टीम प्रयत्न आहे. त्यानंतर हा माहितीपट सर्वांना बघता येईल. त्याचप्रमाणे पुढील काळात नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयातील थिएटरमध्ये देखील हा माहितीपट दाखवण्याची व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागील वर्षी डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. यानिमित्ताने सिंचन क्षेत्रातील त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा, त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे, या हेतूने 'जलनायक' हा माहितीपट तयार करण्यात आला आहे.
अशी माहिती खुद काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनी ट्विट करून दिली.