बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : मागील 24 जून 2022 पासून उदगीर जिल्हा पत्रकार परिषद व मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून, 100 फुटाचा रोड देण्यात यावा, व नंतरच रोड व नालीचे बांधकाम करावे, या मागणीसाठी धरणे आंदोलन चालू होते. धरणे आंदोलनाचा एकूण 29 वा दिवस चालू होता.
या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्र दिले. या लेखी पत्रात येत्या 14 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, पर्यंतचे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढल्या नंतरच रोड व नालीचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या अटीला अधीन राहून, तुर्तास धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. जर 14 ऑगस्ट 2022 पर्यंत अतिक्रमण काढले नाही तर 15 ऑगस्ट 2022 ला छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर व बांधकाम खाते यांच्या कामाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येतील, असे आंदोलन करते पत्रकारांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. पी. देशपांडे यांचे समक्ष कळविले. या पत्रावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्री. एस. पी. देशपांडे यांनी समज मिळाली असे लिहून स्वाक्षरी केली.
या आंदोलनाची सुरुवात उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद व पत्रकार संघ उदगीर यांच्या वतीने गेली 29 दिवसापासून धरणे आंदोलन चालू होते. यावेळी पत्रकार, विविध राजकीय व सामाजिक संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला होता. अशी प्रतिक्रिया यावेळी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली.
येत्या 14 ऑगस्ट 2022 पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने दिलेल्या लेखी पत्र प्रमाणे जर अतिक्रमण नाही काढल्यास, परत 15 ऑगस्ट 2022 पासून धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर व बांधकाम खाते यांच्या कामाच्या ठिकाणी यापुढे तीव्र आंदोलन चालू राहील, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी, प्राध्यापक बिभीषण मध्येवाड, सचिव सुनील हवा, सिद्धार्थ सूर्यवंशी, भगीरथ सगर, अंबादास अल्लमखाणे, बबन कांबळे, सचिन शिवशेटे, मनोहर लोहारे, संग्राम पवार, इरफान शेख, सुधाकर नाईक, बसवेश्वर डावळे, अरविंद पत्की, नागनाथ गुट्टे, अशोक तोंडारे, निवृत्ती जवळे, ऍड. विष्णू लांडगे, ऍड. श्रावणकुमार माने, संगम पटवारी, बालाजी सुवर्णकार, गंगाधर भेंडेगावे, कार्यकारिणीचे सर्व सदस्य पत्रकार यांनी यावेळी सांगितले.