कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : शहरातील एस.बी. लॉन (SB LWAN) जवळील दिलीप दुरुडकर यांचे राहत्या घरी (ता.२२ जुलै) रोजी इंडिया क्रिकेट टिम विरुद्ध वेस्ट इंडीज क्रिकेट टिम चा सुरू असलेल्या एक दिवशीय लाईव्ह (One Day Live) सामन्यावर क्रिकेट बॅटिंग वर पैशाची बाजी लावुन मोबाईल द्वारे खेळ खेळवित असल्याची प्राप्त माहितीच्या आधारे सापळा रचून 'त्या' लोकेशन वर छापा टाकण्यात आला असता दोघांना स्पॉट वरुन ताब्यात घेतले.
सुधीर रमेश चांदेकर (40) रा.शास्त्री नगर वणी, सलीम जमील शेख (35) रा. भाग्यशाली नगर वणी असे स्पॉट वर मिळुन आलेल्या इसमांचे नाव आहे. दरम्यान, त्यांना अधिक विचारपुस केली असता, क्रिकेट बॅटिंग वर हार-जित चा खेळ झालेल्या पैशाचे देवाण घेवाणाचे उघड झाले
या छाप्यात क्रिकेट बॅटिंग जुगार चालविण्यासाठी वापरण्यात आलेले साहीत्य 1 लॅपटॉप, 1 टॅब, 10 मोबाईल, लॉपटॉप चार्जर, 9 दुचाकी व रोख रक्कम पाच हजार 300 रूपये असा एकुण 1 लाख 29 हजार 800 रूपयाचा मुद्देमाल मिळाला. या कारवाई मुळे शहरातील अवैध धंद्यात गुंतलेल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदरची कार्यवाही डॉ.दिलीप भुजबळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि. रामकृष्ण महल्ले यांचे आदेशावरून सपोनि माया चाटसे पो.हे.कॉ सुहास मंदावार, पो.कों. पुरुषोत्तम डडमल, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे करीत आहे.