वणी : रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीने आज 1 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानिमित्ताने उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल सन्माननीय विकास अधिकारी, सभासद व कर्मचारी यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम 21 जून रोजी सायंकाळी वसंत जिनींग येथे मोठ्या थाटात उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संस्थेने अत्यन्त कमी दिवसात यशाचे शिखर गाठले त्याचा प्रत्यय 21 जून या "प्रथम वर्धापन दिवस" दिनी आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. संस्थेचे दैनिक अभिकर्ता  कैलास पचारे, पांडुरंग निखाडे, प्रवीण दोडके, गजानन टोंगे, प्रवीण गाताडे, प्रतीक गेडाम, बबन वाटेकर, अरुण पाटील ला, प्रशांत महाजन, वैशाली बोर्डे, सविता बावणे, पवन बोयले, सुप्रीत मुनोत, सुशील निकोडे, विक्रम टिप्रमवार, शुभम बोबडे, आकाश मांडवकर, सुनील पिंपळकर, विजय पोटे  शुभम रांगणकर, गणेश लाकडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस नेते माजी आमदार वामनराव कासावार हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून राकेश खुराणा उपाध्यक्ष पुसद अर्बन बँक लि. अध्यक्ष व्या. असो. वणी, प्रशांत गोहोकार उपाध्यक्ष वसंत जिनींग अँड प्रेसिंग वणी, पवन एकरे उपसभापती, राजाभाऊ पाथरडकर संचालक वसंत जिनींग, धनंजय आंबटकर जिल्हाध्यक्ष विदर्भ तेली समाज, महासंघ, पांडुरंग पंडिले अध्यक्ष खं.वा. दे.चॅ.ट्र.वणी, महादेव खाडे अध्यक्ष म.वि.प, अशोक चौधरी अध्यक्ष ति. कु. स.सं. वणी, मोहन हिरडे गुरुजी ओबीसी निमंत्रक जनगणना समिती, राजू भोंगळे, प्रमोद वासेकर संचालक वसंत जिनींग, आशिष खुलसंगे अध्यक्ष युवक काँग्रेस झरी जामणी, पुरुषोत्तम आवारी, विधाते सर, संगीता संजय खाडे अध्यक्ष लक्ष्मीनारायण पतसंस्था वणी, विजय निखाडे, अनिल भोयर, ईश्वर खाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजय खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लि.यांनी केले. संचालन बोरकुटे सर यांनी केले तर आभार सुशील निकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे संचालक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी असंख्य शहरी व ग्रामीण भागातील जनतेची उपस्थिती होती. 
वणी : रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचा प्रथम वर्धापन दिन संपन्न  वणी : रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचा प्रथम वर्धापन दिन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on June 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.