गुंजनने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के घेऊन अव्वल!


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील घोरदडा येथील गुंजन वसंता मिलमिले हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण घेऊन गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.
         
गुंजन ही ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे शिकत वर्धा जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला असून गुंजन च्या नावे अनेक रेकॉर्ड्स सुद्धा आहे. २०२१ मध्ये उच्च उंचीच्या वैज्ञानिक फुग्याच्या मदतीने एकाच प्रक्षेपण साइटवर सर्वाधिक फेमटो उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले (प्रत्येकी १०० फेमटो उपग्रह वेगळ्या प्रयोगासाठी डिझाइन केलेले) डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन - हाऊस ऑफ कलाम आणि मार्टिन ग्रुप हे संपूर्ण भारतातील विद्यार्थी एकत्र करतात. या कार्यक्रमात गुंजन सुद्धा सहभागी झाल होती. हे उपग्रह ७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम, भारत येथे प्रक्षेपित केले गेले.
 वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सह असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशन, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, स्पेस ऑन ऑफ इंडिया यांच्याकडून गुंजन ला गौरविण्यात आलेले आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलीने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.
आई-वडील शेतकरी असून घरात कुणीही सुशिक्षित नसताना देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या गुंजन चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. गुंजन हे श्रेय आई वडीला सह शाळेतील प्राचार्य शिक्षक यांना दिलेत.
सह्याद्री चौफेर वर जाहिरातसाठी संपर्क : 9011152179
गुंजनने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के घेऊन अव्वल! गुंजनने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के घेऊन अव्वल! Reviewed by सह्याद्री चौफेर on June 18, 2022 Rating: 5
Powered by Blogger.