चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षांचे आज 17 जूनला बोर्डाकडुन ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आले. 10 वी च्या परिक्षेतही मुलीच अव्वल राहिल्या. 10 वी च्या परिक्षेतही मुलींनीच बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुलीची उतिर्ण होण्याची टक्केवारी जास्त दिसून आली. 10 वी ची परिक्षा शिक्षण क्षेत्रात महत्वाची मानली जाते. शैक्षणीक जीवनाला वळण देणाऱ्या SSC परिक्षा असल्याने विद्यार्थी जीवनात या परीक्षांना अनन्य साधारण महत्व असते. त्यामूळे 10 वी च्या निकालाची सर्वांनाच आतुरता लागलेली असते. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने 10 वी च्या निकाल देखिल निकाल जाहीर केले. यावर्षी इयत्ता दहावी च्या परिक्षेत दारव्हा तालुक्यातील वसराम पाटील विद्यालय पांढुर्णा आदर्श या शाळेचे विद्यार्थी प्रथम क्रमांक चि. रितेश गणेश आडे- 91.80 टक्के,द्वितीय क्रमांक कु. रोशनी पुंडलिक राठोड- 88.60 टक्के, तृतीय क्रमांक कु.सुहानी ठाकरे 88.20 टक्के,कु.स्वीटी राठोड 87.60, आदित्य राऊत 87.60 टक्के कु.धनश्री नक्षणे 87.20 टक्के गुण मिळविले 21 विद्यार्थी प्राविण्य मिळवले व 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असे बाकी सर्व विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी पास होऊन वसराम पाटील विद्यालय पांढुर्णा आदर्श या शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. विद्यार्थयांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याधापक राजेश इंगळे ठाकरे सर, आसोले सर व शिक्षकेत्तर कर्मचारी व वृंद संस्थेचे संचालक व आपल्या आई वडिलांना दिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दारव्हा : दहावीच्या परीक्षेमध्ये वसराम पाटील विद्यालय पांढुर्णा आदर्श शाळेचे विद्यार्थीचे घवघवित यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 18, 2022
Rating:
