शेल्हाळ येथे लसीकरण व पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 
            
उदगीर : पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर मार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य उन्नत भारत अभियान व दत्तक ग्राम योजने अंतर्गत मौजे शेल्हाळ येथे मा. अधिष्ठाता डॉ. रावजी मुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण व पशु आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन (ता.१७ जून) रोजी करण्यात आले.

शिबिरासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. प्रशांत मसारे, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख पशुऔषध वैद्यकशास्त्र विभाग तसेच मुख्य समन्वयक उन्नत भारत अभियान व दत्तक ग्राम योजना, डॉ. वकार अहमद रजाक, सहायक प्राध्यापक, पशुप्रजनन शास्त्रविभाग व  डॉ. राम कुलकर्णी, सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग तथा समन्वयक, उन्नत भारत अभियान व दत्तक ग्राम शेल्हाळ उपस्थित होते. शिबिरात एकूण २६८ जनावरांना घटसर्प व फर्या या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण, २ जनावरांना  जंतनाशक औषधी, ७ जनावरांनवर औषधोपचार आणि १३ जनावरांची प्रजनन तपासणी करण्यात आली.
 शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत मसारे मुख्य समन्वयक उन्नत भारत अभियान व दत्तक ग्राम योजना, शेल्हाळ गावचे पशुधन पर्यवेक्षक श्री.शेख तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी डॉ. धनश्री शेळके, डॉ. सोनाली नाटकर, डॉ. अनुज कोळी, डॉ. अभिषेक घोडके, माधुरी आटला, अनुजा आव्हाड, विद्या आगलावे, अनुराधा कुंभार, ओंकार अन्दुरे, अंगद निषाद, अनुपकुमार, वाहन चालक श्री गीते व महाविद्यालयातील कर्मचारी व शेल्हाळ येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.  

शेल्हाळ येथे लसीकरण व पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न शेल्हाळ येथे लसीकरण व पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on June 18, 2022 Rating: 5
Powered by Blogger.