विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : पावसाळा सुरु झाला की, लाईटचे जाण येणं सुरु होते हे नित्याचेच आहे. मात्र, लाईट गेली की काही वेळात अचानक मोबाईल नेटवर्क गायब होते. हे आपण पहिल्यांदाच ऐकत असाल 'त्याचा आणि ह्याचा' काय संबंध हा संशोधनाचा विषय आहे.
मात्र, अँड्रॉइड युगात वावरणाऱ्यांनी एक शोध घेतला आणि लक्षात आले की, मोबाईलचा शंभर दीडशे फुटाचा टॉवर तर आहे. परंतु त्या टॉवरमध्ये दीड फुटाची बॅटरी नसल्याने लाईट गेल्यावर मोबाईल चा नेटवर्क गायब होतो. हे सिम्पल लॉजिक असून,हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिन्द्रा गावात सुरु आहे.
येथील टॉवरला कायम स्वरूपाचे बॅटरी इन्व्हेटर नसल्यामुळे जिओ ग्राहकांना मोबाईल नेटवर्क चा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. "दीड जीबी आणि गाव बीजी" करून सोडलं. आता जीबी व नेटवर्क पाहिजेत नाहीतर उपभोक्ता आऊटऑफ कंट्रोल होऊन जाते. शिवाय एखादी इमर्जन्सी आली तर, संपर्क होऊ शकत नाही अशी अवस्था येथील 'जिओ टॉवर'ने नागरिकांच्या माथी मारून ठेवली आहे.
निकाल लागले विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि आता शाळेला सुरु होण्याची वेळ जवळ येतेय, ग्रामस्थांसह पालकांना शासकीय काम व कागदपत्राची जुळवाजुळव,धडपड सुरु आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस आला की,लाईट जाते. हे नित्यातेच झाले आहे. अशातच काही वेळाने त्याच्या पाठोपाठ मोबाईल नेटवर्कही जाते. त्यामुळे महत्वाचे ऑनलाईन कामे खोळंबून जात आहे.
परिणामी मच्छिन्द्रा येथे राज्यमहामार्गांवरील शेतात कंपनीने उभारलेल्या टॉवर मधून कायम स्वरूपाचे नेटवर्क मिळेल अशी व्यवस्था करावी, अन्यथा टॉवर चा घासा गुंडाळावा अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. ऑपरेटर एक दिवस येऊन टॉवर चार्जिंग करून जातो, हे डोकेदुखीचे असून दिवस पावसाळ्याचे आहे. हे गांभीर्य लक्षात घेवून रात्री बेरात्री अर्जंट काम पडतात, कोणाला इमर्जन्सी असली तर संपर्क होऊ शकत नसल्याने येथील संबंधित जिओ टॉवर कंपनीने कायमचे ईन्व्हटर बसवावे अशी नागरिकांची मागणी आहे.