सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (६ ऑक्टो.) : काल मंगळवारला रात्री ०७:३० वाजताच्या सुमारास चंद्रपूरच्या पागल बाबा नगर येथील चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच आपचे शहर सचिव राजु शंकर कुडे हे आपल्या कार्यकर्त्यां सोबत घटना स्थळी पोहचले.
घटनेच्या प्रत्यक्ष दर्शनी उपस्थित कामगार यांच्या कडुन संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली. कामगारांनी संगितले की तेथे सुरक्षा संबंधित कोणत्या ही उपाययोजना केलेल्या नव्हत्या जसे अग्निशमन वाहन, फायर सिलेंडर आदीं उपकरणाची व्यवस्था तेथील व्यवस्थापकांनी केलेली नव्हती. कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे ही आग लागली सुदैवाने कुठलीही प्राण हानी झाली नाही. परंतु माेठी काही घटना घडली असती तर याला जबाबदार काेण? असा सवाल ही आम आदमी पार्टी चंद्रपूर ने केला आहे.
या आगीत कामगारांचे माेठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे महत्वाचे कागदपत्र पूर्णपणे जळाले आहे. त्यांना तात्काळ प्रशासनाने मदत करावी. अन्यथा आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर तसेच जिल्हा मिळून कामगारांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे आपचे शहर सचिव राजु कुडे यांनी दिलेल्या एका प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे.
या घटनेला संबधित दोषी अधिकारी व व्यवस्थापकावर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात अशा घटना परत घडणार नाही.
यावेळी आपचे शहर सचिव राजु कुडे, बाबुपेठ प्रभाग सह संयोजक निखिल बारसागडे, चंदु माडुरवार, अंकूश राजूरकर, हितेश धोकडे, जयदेव देवगडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.