सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (५ ऑक्टो.) : सवना येथील रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी होतात तसेच या दवाखान्यात भरपूर प्रमाणात पेशन्टही असतात. मात्र दवाखान्यात असलेली रुग्णवाहिका जीर्ण व नादुरुस्त असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर खासदार साहेबांच्या पाठपुऱ्याव्यातून रुग्णावाहीका मिळाली.
या रुग्णवाहिकेचे आज ग्रामीण रुग्णालय सवना येथे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा चे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोदजी भरवाडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपकरावजी आडे, राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब देशमुख, गोविंदराव देशमुख, डॉक्टर कदम, डॉक्टर दुधे, डॉक्टर देवसरकर यांचे सह कैलास पाटे, सुमित बोईनवाड, लखन राठोड ओम देशमुख, खासदार यांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रसेन आढागळे, अविनाश वजीराबाद ग्रा. रु.कर्मचारी वर्ग, शिवसेना व इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.
सवना ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
