टॉप बातम्या

पहाड वनमाळी समाजाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (०२ सप्टें.) : पहाड वनमाळी समाज तर्फे दरवर्षी प्रमाणे संत रविदास महाराज मंदिर येथे श्रीकृष्ण भगवान मूर्तीची रात्रौ 12.00. ववाजता स्थापना करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

कृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले. महाप्रसाद नंतर भगवान श्रीकृष्ण मूर्ती ची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रमोद लोणारे, आकाश गोलाईत, सुमित बर्वे, दिलीप गोलाईत, निखिलेश डाहे, प्रफुल गोलाईत, आशिष सुतसोनकर, विजय महाजन, मनोज बिजवे, निलेश लोणारे, चरण गोलाईत, राहुल लोणारे, सागर काळे, अतुल सुतसोनकर, पिंटू गोलाईत, व इत्यादी समाज बांधवांच्या उपस्थितीत कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
Previous Post Next Post