Page

रक्षाबंधन पर्वावर वरोरा येथे वृक्षारोपण करण्यात आले

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२६ ऑगस्ट) : दि.२२/८/२०२१ रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर शहरातील दत्त मंदिर वार्ड मोकाशी ले-आऊट वरोरा येथील जिल्हा शिवसेना सरचिटणीस मनिष जेठानी यांच्या सौजन्याने आणि मोकाशी ले-आऊट येथील नागरिक व श्री. गुरुदेव सेवा मंडळ वरोरा चे संयुक्त विद्यमाने ओपण स्पेस(खुल्या जागेत) मध्ये श्री. सुराणाजी, मालुजी यांच्या उपस्थितीत बहुजातीय वृक्षारोपण करण्यात आले.

या निमित्ताने ऑक्सिजन ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण सुराणा यांना वृक्ष भेट देऊन वार्डातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी प्रा. रुपलाल कावळे, चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी यांनी वृक्षारोपण महत्वावर आपले मत व्यक्त केले. व सर्व उपस्थितांचे आभार मानले. डीएन माथनकर, रुपलाल कावळे, ढोके सर, उमरे सर, नितीन उमरे, वामनरावजी खिरटकर, पिजदूरकर सर, आसेकर गुरुजी, भोयर साहेब, लाखेजी, अनुप माथनकर, मुन्ना पाठक, सचिन मेश्राम, जगताप सर, सुरेश वनकर, भोसकर गुरुजी, अनिरुद्ध डहाके, रोकडे व इतर नागरिकांनीही यावेळी वृक्षारोपण केले. या वृक्षांचे  संगोपण करण्याचा व वार्ड परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता सर्वानी श्रमदान करण्याचे यावेळी संकल्प करण्यात आला आहे.