टॉप बातम्या

कोलगाव येथील लाभार्थ्यांना खावटी योजनेचा किराणा साहित्य वाटप

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (२९ ऑगस्ट) : आज मौजा कोलगाव येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत खावटी योजना ही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील किराणा वाटप आज लाभार्थ्यांना मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात प्रती पात्र कुटुंबास रुपये २०००/-खात्यावर जमा करण्यात आले होते.

या योजनेतुन ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबाना कोरोना काळात आधार देण्याचा उद्देश आहे. आज कोलगाव येथील लाभार्थ्यांना किरणा साहित्य वाटप करण्यात आले.

त्या वेळी गणेश जेनेकर सरपंच, सौ.निताताई गावडे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व सुमित सोनटक्के सर, मनोज ढेगळे सर, बंडु गिलबिले उपस्थित होते. 
Previous Post Next Post