सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव, (७ जुलै) : पैनगंगा नदीवर कासारबेहळ शहरात बंधारा बांधावा यासाठी जलसंपदा मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
महागांव तालुक्यातील कासारबेहळ, वरोडी, सेवानगर, टेंभी या नदीकाठावरील गावात अपुऱ्या पाण्यामुळे सिंचनाची सोय नाही. परिणामी शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होत चालली आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर कासारबेहळ शिवारात बंधारा बांधल्यास शेतकऱ्यांच्या शेताला बारामही पाणी मिळू शकेल. तसेच नदी काठावरील गावाची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या ठिकाणी पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदनातून वरुडी सेवा सह सोसायटी अध्यक्ष नंदूभाऊ मस्के, माजी सरपंच अशोक तुमवार, संजय पावडे, विठ्ठल कर्हे, सुभाष करे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.