सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (१६ जुलै) : देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जवळ बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणार्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने आर्णी मार्गावरील वाघाडी पेट्रोलपंपावर केली.
शिवम ढवळे (२१), अभिनव लांडगे (२०), रा. सावर, ता. बाभूळगाव), अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्घ अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयाने आरोपींना शनिवार (ता.१७) पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात डिबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी केली.