अंजनी ग्रामपंचायत सी.सी. टीव्ही कॅमे-याच्या नजरेत, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
नांदेड, (११ जुलै) : बिलोली तालुक्यातील अंजनी ग्रामपंचायतच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून विविध कामाचे उद्घाटन अंजनी गावचे सरपंच महेश पाटील हांडे यांनी केले आहे. गावातील मुख्य ठिकाणी ३० सिमेन्ट बेंच बसविण्यात आले व तसेच गावाच्या सार्वजनिक मुख्य ठिकाणी ४ सी.सी. टीव्ही ग्रामपंचायत बसविण्यात आले. ४ सी.सी. टीव्ही जि. प. प्रा. शाळा, फ्रोगीन्ग मशीन, ग्रामपंचायतचे खुर्ची टेबल व ईतर साहीत्य साहित्य खरेदी करण्यात आले.

यावेळी सरपंच महेश भुजंगराव हांडे, उपसरपंच प्रतिनिधी बालाजी मुंडकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गावंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सिद्धार्थ गावंडे, प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष गणेश पा हांडे, ग्रामपंचायत सेवक शेख सलीम, किशन पाटील पांडे, गणेश मोरे, विजय भरांडे, बाबु भरांडे, राजेद्र गावंडे, देविदास गावंडे, पंढरी भोईवार , संभाजी भरांडे, शेषेराव भरांडे,हाणमंत गावंडे, ग्रामपंचायत ऑपरेटर हांडे लखन, पत्रकार गौतम गावंडे व आदी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

नांदेड: गौतम गावंडे
अंजनी ग्रामपंचायत सी.सी. टीव्ही कॅमे-याच्या नजरेत, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे अंजनी ग्रामपंचायत सी.सी. टीव्ही कॅमे-याच्या नजरेत, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे Reviewed by सह्याद्री चौफेर on July 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.