सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (६ जुलै) : ग्राम पंचायत कारेगाव (पा) येथील 12 वर्षा पासून रहिवाशी असलेल्या नारायण नर्सिंग सोनूले व त्यांची पत्नी शिंधु नारायण सोनूले या दाम्पत्यांनी गट विकास अधिकारी यांना विनंती निवेदन देण्यात आले.
सोनुले दाम्पत्यांनी निवेदनातून म्हटले की, आम्ही 2010 पासून मौजा कारेगाव (पा) येथील रहिवासी असून,
आम्ही ग्रामपंचायतीचे कर पावती नियमित भरत असून, आम्हांला घरकुल मंजूर झाले आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्या शासन परिपत्रकानुसार नमुना 8 चे संगणकीयकृत रेकॉड व करपावती असून, सुद्धा सोनूले यांना ग्रामपंचयातीकडून अतिक्रम हटाव नोटिसा वारंवार देण्यात येत आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना सुरु आहे. या काळात अशा नोटीसा पाठवून बेघर करण्याचा मुद्दाम घाट चालवीला जात असून, एक प्रकारचा सोनुले कुटुंबियांना मानसिक त्रास ग्रामपंचायत कडून दिला जात आहे. असा त्यांनी आरोप केला.
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदी नुसार आम्हला घरकुल बांधण्याची अनुमती देण्यात यावी. अशी मागणी सोनूले कुटूंबियांनी पंचायत समिती झरी चे गट विकास अधिकारी यांना केली.