सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (ता. १५) : युवासेना जिल्हाप्रमुख हिंगोली जिल्हा तथा यवतमाळ विस्तारक दिलीपजी घुगे (साहेब) यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने चिखलगाव येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रमात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी शिवसैनिकांना घेऊन ब्लँकेट वाटप करण्यात आले.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे थंडीही पडतात. त्या शीतलतेची झळ वृद्ध लोकांना जास्तच बसते, अशावेळी त्यांना उष्णता मिळावी व आरोग्य ठणठणीत राहावे या उद्दात हेतूने युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व यांनी बाजीराव महाराज चिखलगाव वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करून श्री.दिलीपजी घुगे (साहेब) व आमचे मार्गदर्शक यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी हेमंत गौहकार, सौरभ वानखेडे, ध्रुव येरणे, शिवराम चिडे, अमृत फुलजळे, दिनेश आवारी, प्रवीण आवारी आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.