सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा, वणी विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हा महामंत्री सौ. शालिनी किशोर दारुंडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मडावी यांच्याशी संपर्क साधून नवरगावातील आरोग्य परिस्थितीची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली.
त्यानंतर आरोग्य सेवक मते यांच्या पथकाने नवरगावात पाहणी केली. यावेळी गावातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले आढळून आले. तसेच बाहेरील वापरासाठी करण्यात येणाऱ्या विहिरीच्या पाण्यात किटक आढळल्याचे निदर्शनास आले. गावातील सांडपाण्याच्या नाल्यांचा योग्य वापर व व्यवस्थापन होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याचेही पाहणीदरम्यान आढळले.
दरम्यान, नवरगाव येथील शासकीय दवाखाना तसेच ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महिला निरीक्षक डॉ. पवन दुधे, वसुंधरा परचाके, मीना मोरे, G.M.M. सीमा पेंदोर, गटप्रवर्तक यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने नागरिकांची माहिती घेतली.
तालुका आरोग्य विभागाच्या रक्तचाचणी मोहिमेंतर्गत अनेक नागरिकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, या तपासणीमुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
नवरगावातील पाणी साचण्याची समस्या, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि पिण्याच्या पाण्याची स्वच्छता याकडे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

