टॉप बातम्या

वणीत सिंगल यूज प्लास्टिकवर नगरपरिषदेचा दणका

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : संपत्तीने समृद्ध असलेल्या वणी शहराचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरू लागला आहे. त्यातच सिंगल यूज प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी ‘स्लो पॉयझन’ ठरत असून, वणीकरांच्या आरोग्यासह शहराच्या पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
राज्यात प्रतिबंधित असतानाही वणी शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री तसेच साठवणूक सर्रास सुरू असल्याचे नगरपरिषदेच्या कारवाईतून समोर आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार वणी नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध आस्थापनांची तपासणी करून ७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल साहित्य जप्त केले.
या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन आस्थापनांवर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई आरोग्य निरीक्षक रुशिकेश वायदांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कर निरीक्षक किरण गडलींग, विक्की करसे आणि मनिष तोमस्कर यांनी कारवाईत सहभाग घेतला.
नगरपरिषदेच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अशा कारवाया सातत्याने राबविण्याची गरज आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();