सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील कणकवाडी येथील एका महिला व्यावसायिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली आहे. विद्या सुधाकर हिवरकर (वय 47) असं त्या राजकारणी महिलेचे नाव आहे.
विद्या हिवरकर यांचा वस्त्र उद्योग व ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय होता. त्या राजकारणी सुद्धा होत्या.घरातच त्या ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने दुपारी शहरातील बघ्याची गर्दी जमली होती. त्यांच्या अशा अचानक निधनाने कणकवाडी परिसरात हळहळ व्यक्त आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहे. मृतक वर्षा यांच्या पाठीमागे पती, मुलगी आणि मुलगा असा आप्त परिवार आहे.