टॉप बातम्या

पतीने आत्महत्यास प्रवृत्त केल्याने आमच्या मुलीने जीवन संपवले; आम्हाला न्याय हवा, पत्रकार परिषदेत आरतीच्या जन्मदात्यांची आर्तहाक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने दि. 19 जुलै 2025 रोजी आत्महत्या केल्याची घटना साईलीला नगरी मध्ये घडली होती. पतीचे अनैसर्गिक वर्तवणूक असल्याने पत्नीने गळफास लावून जीवन संपविल्याचे पत्रकार परिषदेत तिच्या वडिलांनी सांगितले आहे. शहरातील साईलीला नगरी येथील परिसरात संबंधित प्रकार समोर आला होता. आरती जयबुद्ध बुरचुंडे, असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात पतीसह सासू व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र पन्नास दिवस लोटूनही पती मोकाटच आहे. अजूनही अटक केली नाही. हा अन्याय आहे, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन करमरकर कुटुंबियांनी केली.

आरतीचा जयबुद्ध बुरचुंडे सोबत आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. वारंवार माहेरून पैसे आणण्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. याचसोबत जयबुद्धचे पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध, या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे तक्रारदार वडील किशोर करमरकर यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यासंबंधी आरतीच्या वडिलांनी पोलीस प्रशासनावर निष्क्रिय तेचा ही खुलासा केला आहे.

या पत्रकार परिषदेत पीडित कुटूंबातील सदस्यांनी न्यायाची आर्तहाक केली. तसेच वरोरा पोलिसांनी आरतीच्या सासर कडून सेटलमेंट प्रस्ताव खुद समोरासमोर ठाण्यातच केला होता. तेव्हाच आमच्या पायाखालची जमीन सरकली. असंही त्यांनी सांगितलं. यासंबधी सखोल चौकशी सी आय डी मार्फत करावी अशी मागणी वरिष्ठाकडे करण्यात येणार आहेत. तूर्तास पोलिसाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने मृतक आरती चे आई वडील बहीण भाऊ आमरण उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी यावेळी परिषदेत सांगितले. 
Previous Post Next Post