टॉप बातम्या

शिवसेनेचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व नियुक्तीपत्र देऊन स्वागत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व मा. पालक मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची बैठक यवतमाळ येथे पार पडली. 

येथील बैठकीत जिल्ह्यातील अनेकांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या व त्यांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले. त्यात वणी विधानसभा क्षेत्रातील सुद्धा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. 

शिवसेनेचे नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
1) सौ.उज्वला चंदनखेडे यांची यवतमाळ उपजिल्हाध्यक्ष महिला आघाडी शिवसेना या पदावर करण्यात आली. 
2) उमेश वैरागडे यवतमाळ उपजिल्हाध्यक्ष शिवसेना पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
3) चंद्रकांत घुगुल यांची वणी विधानसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली .
4) प्रसाद ठाकरे वणी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 
5) बाळू चिडे झरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 
6) विशाल किन्हेकर यांची मारेगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
7) संजय आवारी तालुका समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.
8) लाभेश खाडे मारेगाव शहर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली .
9) वणी शहर प्रमुख पदी 
 शिवराज दिनकर पेचे 
यांची नियुक्ती करण्यात आली.
10) अजय नागपुरे 
वणी शहर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.
11) महेश चौधरी वणी येथील शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व वणी विधानभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे यावेळी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post