टॉप बातम्या

प्रवीण बलकी यांची शिवसेनेच्या तालुका संघटक पदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा बिगुल आता केव्हाही वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या संघटन बळकटीसाठी नवीन नियुक्त्या व नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले आहे. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात व हस्ते मारेगाव तालुका संघटकपदी प्रविण बल्की यांना यवतमाळ येथील आयोजित बैठकीमध्ये नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
27 वर्ष एक पक्ष, एक झेंडा, एक नेता एक विचार म्हणजे स्व.बाळासाहेब ठाकरे. त्यांचे विचार अंगी बाळगून मी शिवसेनेत काम करत आहे. आज त्याच फलित झाले, मला तालुका संघटक पदाची जबाबदारी देऊन पक्ष आणखीन जोमाने कसा वाढवता येईल,यावर माझा भर असणार आहे. असं पहिल्यांदाच नवनियुक्त तालुका संघटक प्रवीण बलकी यांनी 'सह्याद्री चौफेर'शी बोलताना सांगितले. 

यावेळी त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिवसेना नेते तथा माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांना दिले. व त्यांनी पालकमंत्री संजय राठोड व विश्वास भाऊंचं माध्यमातून आभारही मानले. पुढे म्हणाले की,नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आणि समाजहिताच्या कार्यांसाठी एकजूट आणि समर्पणाने काम करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
Previous Post Next Post