टॉप बातम्या

महसूल सेवकांना चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचा दर्जा द्या,अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शासनाचा महत्वाचा कणा असलेल्या महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महसूल सेवक यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे. महसूल सेवक हा महसूल विभागाचा कणा आहे. राज्याची विविध शासकीय धोरणे, उपाययोजना, शासन ते ग्रामपातळीवरील महत्वाच्या योजना, तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरु असलेल्या महत्वाच्या योजना इत्यादीची अंमलबजावणी अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महसूल यंत्रणा ज्यात जिल्हाधिकारी ते महसूल सेवक स्तरापर्यंत कार्यरत असतात. महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा सर्वात प्रमुख विभाग आहे. महसूली कामासोबतच विविध प्रमाणपत्रे देणे,  
जनतेच्या दैनंदिन गरजांशी निगडित असलेला हा विभाग आहे. त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबीत करणारा हा विभाग आहे. 24 तास वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या या महसूल सेवाकांना शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही. त्यामुळे या महसूल सेवकांवर अन्याय होत आहे. या महसूल सेवक पदाचे यंत्रनेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक यांना इतर महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात यावे. अन्यथा 12 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा महसूल सेवकांनी तहसीलदार वणी यांना दिला. महसुल सेवक (कोतवाल) यांचे कामाचे स्वरुप व्यापक आहे.
नैसर्गिक आपत्ती मध्ये नदी , नाल्या काठी ,रात्रपाळी मध्ये काम करावे लागते,ग्राम महसुल अधिकारी कार्यालय परिसर स्वच्छता करावी लागते. संजय गांधी विभागातील लाभार्थ्यापर्यन्त dbt बाबत माहिती देणे किंवा त्या विभागात आपली duty करावी लागते.zero pendancy ची पूर्ण कामे करावी लागतात, राष्ट्रीय सण पताका लावणे,चुना आखणे कार्यक्रमाची किरकोळ तयारी करावी लागते.शिपाई संवर्गाची पदे रिक्त असल्याने जिल्हाधिकारी कार्यालया पासून ते तहसिल पर्यन्त शिपाई सवर्गाची सर्व कामे करावी लागतात,तलाठी कार्यालयातील सर्व कामे करावी लागतात,ई पीक पाहणी करावी लागते, पीक नुकसान पंचनामे करिता पूर्ण शेत शीवारावर अधिकार्‍यांसोबत फिरावे लागते.शासकीय पंच म्हणून काम करावे लागते पोलिस स्टेशनला.महसूल वसुली करावी लागते,फेरफार नोटीस बजावावी लागते खातेदार यांचे घरी जाऊन.गावात प्रत्येक योजना ही लोकाभिमुख करावी लागते म्हणजे प्रसिद्धी करावी लागते दवंडी द्यावी लागते.रेतिघाट रात्र डुटी,प्रत्येक शासकीय योजनेची दवंडी देणे.महसूली कामांची जबाबदारी या महसूल सेवकांवर सोपवली जाते.

यावेळी तालुका अध्यक्ष श्री.प्रफुल लोडे, उपाध्यक्ष श्री.संजय कुचनकर, सचिव श्री.राकेश संकिलावर,पवन पचारे,विकास चिडे, अंगुल फुसाटे,महादेव गाते,पूजा मेश्राम इ. महसुल सेवक उपस्थित होते.
Previous Post Next Post