सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
राळेगाव : जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी पत्रकार मा.रजत चांदेकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे आदेश संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष जाधव यांनी दिले असून राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैय्यद, प्रदेश अध्यक्ष देविदास बैरागी, महिला विभाग राज्य अध्यक्ष मनीषाताई पवार, राज्य उपाध्यक्ष सुधीर उमराळकर, व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश बागुल यांच्या जाहीर सूचनेनुसार पत्रकार संघाची यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथील पत्रकार विविध माध्यमात तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे रजत चांदेकर यांची यवतमाळ पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निवडीनंतर बोलताना रजत रामाजी चांदेकर यांनी सांगितले, की जनकल्याण मराठी पत्रकार संघांचे मुख्य विश्वस्त संतोष जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश अध्यक्ष देविदास बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याण मराठी पत्रकार संघटना कार्य वाढीसाठी तसेच समाजातील अन्याय व अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
तसेच महिला यवतमाळ जिल्हाध्यक्ष रंजना आडे, उपाध्यक्ष प्रमोद मेटांगे, कार्याध्यक्ष विरेंद्र चौहान, यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे. सर्व यवतमाळ नवनिर्वाचित कार्यकारिणीचे संघटनेत स्वागत करून मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.