सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वाढदिवस म्हटला की कार्यकर्त्यासाठी चैतन्याचा, उत्साहाचा दिवस. आपल्या आवडीच्या व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी ठरलेली असते. सोबतीला विविध समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल ही हल्लीची पद्धत. मात्र,मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.मनिषा सुरेंद्र निब्रड यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला.
सोमवारी दिनांक ११ ऑगस्ट ला सायंकाळी वसंत जिनिंग लॉन येथे वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमात मंजुळा माता महिलांच्या भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात मंजुळा माता महिला भजन मंडळाचे प्रमुख राजेंद्र कोरडे यांचा यावेळी निब्रड परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य परशुराम पोटे, अजय चन्ने, श्री. सुरेंद्र निब्रड, सौ.प्रेमीला चौधरी यांच्यासह मित्र परिवार व आप्तेष्ट मंडळी उपस्थित होते.