टॉप बातम्या

संजय खाडे यांचे तर्फे शिव भक्तांना प्रसादाचे वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : श्रावण महिन्यात उपवास, धार्मिक विधी आणि सणांना विशेष महत्व आहे. पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात राहून, आध्यात्मिक आणि पारंपरिक गोष्टी करणे शुभ मानले जाते. 

याच अनुषंगाने श्री काशी शिवमहापुराण कथा समिती, वणी द्वारा आयोजित भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. जैताई मंदिर येथून ही यात्रा कैलास शिखर (शिरपूर) येथे पोहचतात.या यात्रे मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना वणी शिवतीर्थावर प्रदेश सचिव संजय खाडे यांचे तर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ यावेळी घेतला.या प्रसंगी कावडीयांचे त्यांनी स्वागत केले व या कावड यात्रेत सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. आदिवासी सोशल फोरम चे अध्यक्ष रमेश मडावी, पुरुषोत्तम आवारी, दादाजी बेलेकर व संजय खाडे मित्र परिवार उपस्थित होते.

या यात्रेला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर ते भाविकांच्या अढळ श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक देखील आहे.असं काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी 'सह्याद्री चौफेर'शी बोलताना म्हणाले. श्रावण महिना, पावसाळ्याच्या दिवसात येतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही हा महिना खूप महत्वाचा असतो. या महिन्यात भरपूर पाऊस मिळावा आणि पिकांची चांगली वाढ व्हावी यासाठी शेतकरी महादेवाची प्रार्थना करतात. असंही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post